Share

येत्या काळात राज्यात एकट्याला सत्ता स्थापन करण्याची संधी; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Published On: 

🕒 1 min read

वाशिम:- राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आम्ही स्वतःच्या ताकदीवर एक जागा मिळवली आहे. तसेच हैदराबाद इथं झालेल्या निवडणुकीत ही प्रचंड मोठं यश मिळालं आहे. दरम्यान, येत्या काळात महाराष्ट्रामध्ये एकट्याला सत्तेवर बसविण्याची संधी तिन्ही पक्षांनी दिली असून, त्याचा फायदा घेणार असल्याचं मोठं विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हिंगोली जिल्ह्यात लग्न समारंभासाठी जात होते. त्यादरम्यान वाशीम इथं आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घरी कार्यकर्त्यासोबत ते बोलत होते.

दरम्यान, हैदराबादची निवडणूक ही भाजपने सर्वशक्तीने लढली असली तरी ती शिवसेनेसाठी लिटमस टेस्ट म्हणता येईल. कारण पाच वर्षापूर्वी केवळ ४ जागा जिंकणाऱ्या भाजपने हैदराबादेत ४८ जागा जिंकून, मुंबईतील लढाईसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. जर हैदराबादसारख्या निवडणुकीत अमित शाह, जे.पी.नड्डा, योगी आदित्यनाथ हे मैदानात उतरु शकतात, तर आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईच्या निवडणुकीत कोण कोण उतरु शकतं याचा अंदाज बांधता येईल.

आपण विधानपरिषदेच्या चार जागा फक्त दूर राहिलो आणि दक्षिणेतही आपल्याला प्रचंड मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रात येत्या काळात एकट्याची सत्ता बसविण्याची संधी या तीन पक्षांनी दिली आहे. त्या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!