Share

Vikram Gokhale | “विक्रम गोखले यांच्या निधनाचं वृत्त खोटं”, पत्नी वृषाली यांनी दिली माहिती

Published On: 

🕒 1 min read

Vikram Gokhale | मुंबई : बुधवारी संध्याकाळपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. हे वृत्त खोटं असून याबाबत त्यांची पत्नी वृषाली गोखले (Vrushali Gokhale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी वृषाली गोखले यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत देखील माहिती दिली आहे.

“बुधवारी दुपारी ते कोमात गेले आणि तेव्हापासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीयेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. पुढे काय करायचं हे सकाळी डॉक्टर ठरवतील. त्यांची प्रकृती सुधारतेय का, ते प्रतिसाद देत आहेत का, यावरून डॉक्टर पुढील निर्णय घेतील, असं वृषाली यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र आता पुन्हा ती बिघडली. हृदयाशी आणि किडनीशी संबंधित समस्या त्यांना जाणवत आहेत. त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे, असं देखील त्या म्हणाल्या.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ (1999) मध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांच्या भूमिकेत विक्रम गोखले ( Vikram Gokhale ) यांनी प्रभावी कामगिरी केली. विक्रम गोखले यांनी ‘हे राम’, ‘तुम बिन’, ‘भूल भुलैया’, ‘हिचकी’ आणि ‘मिशन मंगल’ यांसारख्या बॉलीवूड हिट चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ‘निकम्मा’ (2022) होता, ज्यात अभिमन्यू दासानी, शर्ली सेटिया आणि शिल्पा शेट्टी सह-अभिनेत्री होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!