टीम महाराष्ट्र देशा : सोमवारी किशोरी शहाणे आणि शिव या दोघांमध्ये कप्तानपदासाठी चागलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. बिग बॉसच्या सुचनेनुसार या दोघांनाही मनोरा रचायचा होता. या कप्तानपदाच्या कार्यामध्ये शिवने बाजी मारुन कप्तानपदाचा कार्यभार स्वीकारला.
दरम्यान, बिग बॉसकडून ‘हिशोब पाप पुण्याचा’ हा नॉमिनेशन टास्क दिला. पहिल्यांदा पराग आणि अभिजित या दोघांनी एकमेकांच्या पाप पुण्याचा हिशोब मांडला. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले, त्यानंतर पराग नरकात तर अभिजित स्वर्गात असा शिव याने निर्णय दिला.
त्यानंतर किशोरी आणि सुरेखा यांच्यापैकी किशोरी नरकात तर सुरेखा स्वर्गात असा निर्णय शिव याने घेतला. त्यानंतर वीणा आणि हीना एकमेकींच्या भरपूर चुका सांगतात, अखेर शिव आणि सल्लागार यांच्या विचाराने हीना स्वर्गात जाते तर वीणा नरकात जाते. शेवटी वैशाली आणि रुपाली एकमेकींवर अतिशय कुरघोडी करतात, इथे शिव वैशालीला स्वर्गात पाठवतो तर रुपालीला नरकात पाठवले.
त्यानंतर माधव याच्यासोबत पाप पुण्याचा हिशोब मांडण्यासाठी, जे लोक स्वर्गामध्ये गेले आहे त्यांच्यापैकी शिव हीनाला असुरक्षित करून माधवसोबत हिशोब मांडायला उभे केले. त्यानंतर हीनाला नरकात तर माधव स्वर्गात पाठवले.
अशाप्रकारे वीणा, पराग, रुपाली आणि किशोरी या चौघांनाही शिवने असुरक्षित केल्याने हा ग्रुप प्रचंड चिडतो. शिव स्वतःच्या बुद्धीने खेळला नाही असा आरोप त्याच्यावर केला जातो. अशाप्रकारे या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी वीणा, पराग, रुपाली, हीना आणि किशोरी हे लोक या आठवड्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.


