🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : कसं काय आहे जळगाव … असा प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जळगावात भाषणाला सुरवात केली. ” पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्तृत्त्वत महायुतीला निवडून आणण्यासाठी तुमच्या सर्वांच समर्थन मागण्यासाठी आलो आहे. त्यासाठी आम्हला महाजानादेश देणार का असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. आज (ता. १३ ) जळगावात सभेला संबोधित करत आहेत.
सभेत बोलताना ते म्हणाले, जम्मू काश्मीर मध्ये जी असामान्य परिस्थिती होती ती सामान्य करायला चार महिनेही लागणार नाहीत. जम्मू काश्मीर फक्त भारताचा एक भाग नाही तर ते भारतच मस्तक आहे. पाच ऑगस्ट रोजी एनडीए सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे आज जगभरातून भारतच कौतुक होत आहे. जम्मुकाशीर आणि लदाख फक्त जमिनी नाहीत तर तो भारताचा एक अविभाज्य घटक आहे. आम्ही १३० कोटी भारतीयांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहोत. जी उरलेली स्वप्ने पूर्ण करायची आहे ती तुमच्या मतांमुळे पूर्ण होणार आहे.”
ते पुढे म्हणाले, चार महिन्यांपूर्वी लोकसभ निवडणुकीत महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने मतदान केले. आता विधानसभा निवडणुकीत पुरुषांच्या पुढेही जाऊन मतदान करा. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्तृत्त्वात महायुतीचे सरकार आणण्यासाठी तुमच्या सर्वांच समर्थन मागायला आलो आहे. मात्र देशातील काही नेत्यांचा सूर राष्ट्रहिताच्या विरोधी आहे. त्यांची भाषा शेजारील देशांसारखी झाली आहे. मात्र खरा पैलवान कोण आहे हे जनताच त्यांना दाखवून देईल असे म्हणत त्यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी यांची जळगाव आणि भंडाऱ्यात जाहीर सभा होत आहे. राज्यातील विविध भागात आज नेत्यांची सभा होणार आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सत्ताधारी नेत्यांसोबत विरोधी पक्षातील काँग्रेसे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1183296661545570304?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183296831603666945?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

