Share

लॉकडाऊनमुळे मिस्टर परफेक्शनिटचा मुलगा पण ‘तिथे’ अडकला

Published On: 

महाराष्ट्र देशा टीम : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आणि बरेच लोक आपल्या कुटुंबापासून दूर अडकल्याचं बोललं जात आहे. यामध्ये अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा देखील समावेश आहे.

सलमान खान त्याच्या काही नातेवाईकांसोबत त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर अडकलाय तर आता मिस्टर परफेक्शनिट आमिर खानचा मुलगा जुनैद खानसुद्धा कुटुंबापासून दूर पाचगणीला अडकल्याचं बोललं जात आहे. असे वृत्त महाराष्ट्र टाइम्स ने दिले आहे.

ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केलं त्यादिवशी जुनैद पाचगणी येथील त्यांच्या बंगल्यात होता. तर आमिर आणि त्याचे कुटुंबिय वांद्रेच्या पाली हिल भागातील घरी आहेत. पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर जुनैदने मुंबईत परत येणं अपेक्षित होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या शिफारसीनंतर ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता त्याला आणखी काही काळ तिथेच थांबावं लागणार असून एकट्याला रहावं लागत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!