Share

जवळपास एक कोटींचा मुद्देमाल जप्त करत आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या

Published On: 

औरंंगाबाद : पेट्रोल पंपावरुन डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटकेत असलेल्या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी चार ट्रक, डिझेल चोरी साठी लागणारे साहित्य, तीन हॅण्डपंप, आठ, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ९८ लाख ४९ हजार ४२० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शुक्रवारी (दि.१९) पत्रकार परिषदेत दिली. अटकेत असलेल्या टोळीकडून ३६ गुन्हे उघडकीस आले असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

रामा पवार (३०, रा.लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता.वाशी,जि.उस्मानाबाद) असे डिझेल चोरी करणाऱ्या टोळी प्रमुखाचे नाव आहे. तर धनाजी महादेव पोळ (३५), रामा सूबराव काळे (३०), गुलाब उर्फ गुलच्या गणपु काळे (१९), दशरथ लक्ष्मण काळे (१९), उध्दव बापु शिंदे (२१), गणेश काळू पवार (२३), लक्ष्मण पन्या पवार (४०), विकास मचिंद्र काळे (२१), राजेंद्र शहाजी काळे (१९), नितीन बापु पवार, किरण अर्जुन काळे (सर्व रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद) ही रामा पवार याच्या साथीदाराची नावे आहेत. तर विनोद नानासाहेब बारकुले (वय२७) आणि रोहित दिलीप मोरे (वय २९, दोघे रा. येरमाळा ता. कळम जि. उस्मानाबाद) हे दोघे चोरीचे डिझेल खरेदी करण्यासाठी आलेल्यांची नावे आहेत. प्रदीप प्रल्हाद राठोड (वय ४०, रा.सिडको एन-३ परिसर, औरंगाबाद) यांच्या चित्तेगाव शिवारातील पेट्रोल पंपावरून १७फेब्रुवारीच्या रात्री ३ लाख ४५ हजार रूपये किंमतीचे ३ हजार ४८० रूपये किंमतीचे डिझेल चोरी गेले होते. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणाचा तांत्रिक तपास करून स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक संदीप सोळंके, गणेश राऊत, सहायक फौजदार सय्यद झिया, वसंत लटपटे, जमादार श्रीमंत भालेराव, धिरज जाधव, विक्रम देशमुख, नामदेव सिरसाठ, बालू पाथ्रिकर, किरण गोरे, प्रमोद खांडेभराड, संजय देवरे, शेख नदीम, वाल्मीकी निकम, संजय भोसले, राहूल पगारे, नरेंद्र खंदारे, योगेश तरमाळे, ज्ञानेश्वर मेटे, बाबासाहेब नवले, जीवन घोलप आदींच्या पथकाने राष्ट्री महामार्ग क्रमांक ५२ वरील नवीन टोलनाका व झाल्टा फाटा येथे सापळा रचून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीच्या आणि चोरीचे डिझेल खरेदीसाठी आलेल्यांच्या मुसक्या आवळल्या.

स्थानिक गुन्हेशाखेच्या ताब्यात असलेल्या टोळीविरूध्द कर्नाटक राज्यात १० ते १२, गुजरातमध्ये ८ ते ९ ठिकाणी डिझेल चोरीचे गुन्हे केले आहेत. तसेच महाराष्ट्रात जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, अकोला, अमरावती, जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरुन डिझेल चोरीची कबुली दिली आहे. या टोळीविरूध्द औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, खुलताबाद, कन्नड ग्रामीण, पाचोड, सोयगाव, वाळूज या ठिकाणी देखील गुन्हे दाखल आहेत. डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पदार्फाश करून टोळीला गजाआड करून ३६ गुन्हे उघडकीस आणणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाला ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ३५ हजाराचा रिवॉर्ड जाहीर केला आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांनी पहिल्यांदाच या टोळीला गजाआड करण्यात यश मिळविले असल्याचे पोलिस अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!