Share

परभणीच्या शासकीय रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी लागली आग

Published On: 

परभणी : शासकीय रुग्णालयात शनिवारी रात्री आग लागली होती, यानंतर रविवारी संध्याकाळच्या सुमारास पुन्हा आगीची घटना समोर आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील लाँड्री विभागास आग लागल्याने रुग्णांसह परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

शनिवारी रात्रीच रुग्णालयातील अपघात विभागाच्या वरच्या मजल्यावर ठेवलेल्या साहित्यास मोठी आग लागली होती. अचानक आग लागल्याने तेथे मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर खालच्या मजल्यावरील अपघात विभागातील रुग्णांना तातडीने बाहेर हलवण्यात आले. या घटनेला 24 तासही उलटले नसतील तोच आज संध्याकाळी पुन्हा लाँड्री विभागात आगीचे लोळ पाहायला मिळाले.

आग लागल्याचे समजात उपस्थित कर्मचाऱ्यांनी सामान्य नागरिकांच्या मदत ती शमवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अग्निशमन विभागलाही आगीची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी तातडीने दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून या घटनेमुळे रुग्णांसह परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!