Share

बारावीच्या परीक्षांचा घोळ सुरूच ; केंद्र सरकारनं विविध राज्यांकडून सूचना आणि मतं मागवली

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- इयत्ता बारावीच्या परीक्षासंदर्भात केंद्र सरकारनं विविध राज्यांकडून सूचना आणि मतं मागवली आहेत. ती विचारात घेऊन येत्या 1 जूनपर्यंत परीक्षांसंदर्भात माहिती दिली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल CBSE च्या तसंच विविध राज्यांच्या शिक्षण मंडळांच्या बारावीच्या परीक्षा आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर; महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्यासह विविध राज्याचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव या बैठकीला उपस्थित होते.

बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीनं घेता येतील; कधी घेता येतील याबाबत यावेळी विचार विनिमय झाला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांचं शैक्षणिक भविष्य आणि एकंदरच शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीनं यथायोग्य निर्णय घेण्यावर सरकारचा भर असल्याचं रमेश पोखरियाल यावेळी म्हणाले. विद्यार्थी आणि पालकांमध्ये असलेली अनिश्चिततेची भावना दूर करण्यासाठी लवकरच सर्वानुमते निर्णय होईल असं ते म्हणाले.

कोरोना संकटाच्या काळातही ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू होतं; कोरोना परिस्थितीमुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असतात; याबाबत आपले विचार आणि मतं राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी येत्या मंगळवार पर्यंत पाठवावीत असं पोखरीयाल म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!