Share

‘…बहिष्कार टाकणे हे लोकशाही विरोधी आणि पूर्वग्रह दूषित रोगट मानसिकतेचे लक्षण’

Published On: 

नवी दिल्ली : सरकार संविधानाच्या मूलभूत मूल्यांचा अनादर करत असून संसदीय लोकशाहीचा अवमान करत आहे, असे म्हणत विरोधकांनी शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. यावरच लोकशाहीमध्ये मर्यादा राखून आणि सन्माननीय आचरण करणे आणि देश आणि राष्ट्राच्या हितासाठी एकत्रितपणे काम करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. विरोधी पक्षांनी येऊन आपल्याशी चर्चा केली असती तर काहीतरी तोडगा काढला असता. हा संसदेचा कार्यक्रम होता, पंतप्रधान किंवा पक्षाचा नाही. ही चांगली परंपरा नाही, असे अशा शब्दांत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla)यांनी विरोधकांवर सुनावले. याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी देखील ट्विट केले आहे.

भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की,’हा काही पंतप्रधान किंवा पक्षाचा कार्यक्रम नाही’ अशा शब्दात लोकसभा अध्यक्षांनी संविधान दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधी पक्षांना समज दिली आहे. संविधान दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे हे लोकशाही विरोधी आणि पूर्वग्रह दूषित रोगट मानसिकतेचे लक्षण आहे. तीव्र निषेध.’

दरम्यान, संविधानात नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य आणि समानता या मूलभूत अधिकारांची व्यवस्था आहे. त्यामुळे संविधान दिनाच्या दिवशी देशासाठी आपले कर्तव्य समजून घ्या, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. संविधान दिनानिमित्त संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!