Share

 बंद पडलेल्या शुगर मिल जवळ आढळला युवकाचा मृतदेह

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गारज येथील बंद पडलेल्या शुगर मिल जवळ एक पस्तीय वर्षीय युवकाचा मृतदेह सोमवार दि.२४ आढळुन आला. औरंगाबाद नाशिक महामार्गालगत बंद पडलेल्या शुगर मिल जवळ सोमवारी सकाळी सात वाजता एक अनोळखी इसमाचा चेह-यावर व गळ्यावर जखमा असलेला मृतदेह आढळून आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली. बाजारसावंगी येथील अण्णा उत्तम जाधव (३५) यांचा तो मृतदेह असल्याचे समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिस ठाण्याचे सपोनी गोरख शेळके यांनी श्वान पथकास पाचारण केले. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सकाळपासून सोशल मीडियावर मृतदेहाचे फोटो व्हायरल करण्यात आले होते. तब्बल सहा ते सात तासातच सोशल मीडियाच्या माध्यमातून मृतदेह खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथील अण्णा उत्तम जाधव (३५) असल्याचे समोर आले.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला असून वैद्यकीय अधिकारी डॉ शेख यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रसंगी वैजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी वैâलास प्रजापती, शिऊर पोलिस ठाण्याचे सपोनी गोरख शेळके, फौजदार नागटिळक, पोहेका विष्णू जाधव, धनेधर, अमोल कांबळे, रावते, गुन्हे अन्वेषण विभागाचे फौजदार जी.टी.राऊत, पोहेका देशमुख, निकम, पोका मेटे घटनास्थळी हजर होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!