भिगवण : राज्यातील कोणीही उपाशी झोपु नये या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने चालू केलेल्या शिवभोजन थाळी या योजनेचा शुभारंभ बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि इंडपूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांतून भिगवन शहरामध्ये शिवभोजन थाळी योजना सुरू झाल्याने गरजू त्याचा लाभ घेत आहेत.
इंदापूर तालुक्यातील गोरगरीब, निराधार,स्थलांतरीत कोणीही उपाशी झोपणार नाही याची इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार भरणे यांनी दक्षता घेतली असून शिवभोजन थाळी योजनेसाठी गोरगरिब जनतेचे पाच रूपये भिगवन परिसरातील दानशुर व्यक्तिंनी भरून ही योजना यशस्वी केली आहे.
शिवभोजन थाळी चालू झाल्याने या भागात मासे मारी करणारे, हॉटेल मध्ये काम करणारे मजूर, असे अनेक लोक अडकून पडले असल्याने आता ते सर्व जण याठिकाणी येऊन जेवण करत आहेत. त्यामुळे येथील गरजूचा जेवणाचा सध्याचा प्रश्न सुटला आहे. भिगवण परिसरात शिवभोजन थाळी चालू झाल्यामुळे रोज याठिकाणी कोण ना कोण १५० थाळ्याचे रोजचे पैसे देऊन सहकार्य करत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

