बीड : आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करून नंतर तिच्या डोक्यात दगड मारण्याच्या प्रयत्न केल्याची घटना परळीत चार वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणी रोडरोमिओला अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्या. सापटनेकर यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सतीश वसंत मंत्रे असे त्या रोडरोमिओचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, आठवीच्या वर्गात शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली होती. रस्त्यात सतीश मंत्रे याने तिची छेड काढून जिवे मारण्याची धमकी दिली होती. घाबरलेल्या पीडितेने झालेली घटना पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी सतीशच्या घरी जाऊन त्याला समजावून सांगितले होते. त्यामुळे संतापलेल्या सतीशने पीडिता सकाळच्या वेळी शाळेत जात असताना तिला वाटेत अडवले. यापूर्वीची घटना तू घरी का सांगितलीस? असे म्हणत तिला शिवीगाळ करत सोबत आणलेल्या चाकूने तिच्या पोटावर वार करून तिला गंभीर जखमी केले.
त्यानंतर रोडवर पडलेल्या पीडितेच्या डोक्यात मारण्यासाठी त्याने मोठा दगड उचलला, परंतु सतीश दगड मारणार तेवढ्यात तिथे जमा झालेल्या लोकांनी त्याला पकडल्याने पीडितेचा जीव वाचला. याप्रकरणी सतीश मंत्रे याच्यावर परळी शहर पोलिस ठाण्यात पोक्सोसह विनयभंग आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- नोकरदारांसाठी महत्वाची बातमी: EPFO कडून व्याज दराच्या घोषणेची शक्यता
- काका, आपण ‘महाराष्ट्राचं नेतृत्व’ करावं ह्याच सदिच्छा ! तांबेंच्या शुभेच्छांनी चर्चांना उधाण
- स्टेजवर वर पुन्हा रंगणार डॉक्टर गुलाटी आणि चप्पूची जुगलबंदी
- ग्रेटाच्या टुलकिट प्रकरणात अडकलेला शंतनू मुळूक आहे तरी कोण?
- अलाहाबाद बँक ग्राहकांसाठी आले मोबाइल बँकिंग अॅप: जाणून घ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

