Share

टीम इंडियाचा ‘एक्स फॅक्टर’ जडेजा मुंबईत दाखल ; फोटो शेअर करत म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१ चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी सामन्यांसाठी रवींद्र जडेजाचे पुन्हा टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमन झाले.

टीम इंडिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं सध्या भारतीय क्रिकेटपटूंना ब्रेक मिळाला आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजा या ब्रेकमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी जय्यत तयारी करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CPPpvsNJRWh/?utm_source=ig_web_copy_link

अष्टपैलू रवींद्र जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यासाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी सोमवारी मुंबईत आपला क्वारंटाईन कालावधी सुरू केला. जडेजाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि “प्रवास सुरु झाला” असे कॅप्शन देत पोस्ट शेअर केली. गेल्या आठवड्यात मिताली राज, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, मयंक अग्रवाल आणि वॉशिंग्टन सुंदर हे चार्टर्ड विमानाने मुंबईत दाखल झाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!