मुंबई : काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांचे तर भाजपकडूनही संजय उपाध्याय यांचे नामांकन दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याकरीता काँग्रेसकडून प्रयत्न सुरु असून याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे केली आहे. ‘महाराष्ट्रात राजकीय संघर्ष होत असला तरी, नेमक्या कोणत्या काळात विरोधकांना कशी मदत करायची असते, याचे काही अलिखित संकेत आहेत. ते पाळले जावेत, याचसाठी फडणवीस यांची भेट घेतली. ही निवडणूक होऊ नये, अशी मागणी असल्याचे पटोले यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
मात्र, या भेटीमागे काही गोष्टी दडल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. सूत्रांच्या माहितीनूसार, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे देखील राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध पार पाडावी यासाठी उत्सूक आहेत. मात्र, त्या त्या बदल्यात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली. मागील अधिवेशनात भाजपाचे १२ आमदार निलंबित करण्यात आले आहेत. या आमदारांचे निलंबन रद्द करावे असा प्रस्ताव फडणवीसांनी काँग्रेसला दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी असा काही प्रस्ताव दिल्याच्या माहितीचे खंडण केले आहे. ते म्हणाले की, ‘भेटी दरम्यान फक्त राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. अन्य कुठलाही प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला नाही. फडणवीस यांनी आपण कोअर कमिटीशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे सांगितले आहे. या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही चर्चा झालेली नाही असेही थोरात म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘केवळ राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा; अन्य कुठलाही प्रस्ताव नाही’, महसूलमंत्र्यांचे स्पष्टीकरण
- ‘अतिशय भयंकर आणि संतापजनक; अत्याचारांच्या प्रकरणामुळे चीड येतेय’, फडणवीसांचा संताप
- भाजपा सरकारच्या काळात महाराष्ट्रात पोलिसांचा दबदबा होता; चंद्रकांतदादांचा दावा
- ‘महाविकास आघाडीच्या एकीवर काँग्रेसला विश्वास नाही का?’, ‘त्या’ भेटीवर सेना-राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा
- ‘फडणवीस आमचा मान ठेवतील, शब्द मोडणार नाहीत’, राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेस नेत्यांना विश्वास


