🕒 1 min read
Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यापासून विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे अडसरकर (Vaijnath Waghmare Adsarkar) यांचा आज एकनाथ शिंदे गटात प्रवेश होणार आहे. अशातच प्रवेश करण्यापुर्वीच त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर घणाघात केला आहे. अंधारे यांनी कमी वेळात नाव कमवल्याची चर्चा आहे. याच चर्चांवर वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यादरम्यान, सुषमा अंधारे या मुलुख मैदानी तोफ नाहीत, त्यांना मीच घडवलं आहे, असा दावा वैजनाथ वाघमारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांच्यासोबत कोणतेही मतभेद नसून ही विचाराची लढाई आहे, असं देखील वाघमारे म्हणाले. तसेच त्यांना ते विचार आवडले त्या तिकडे गेल्या, मला एकनाथ भाईंचे विचार आवडले, एकनाथ शिंदे यांचा विद्रोही, क्रांतिकारक स्वभाव आहे, त्यामुळे मी त्यांच्याकडे आलो आहे, ही विचाराची लढाई आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
दरम्यान, वाघमारे यांना सवाल करण्यात आला होता. यावेळी, सुषमा अंधारे या मुलुख मैदानी तोफ आहेत का?, याला उत्तर देताना, तोफ वगैरे काही नाही. त्यांना घडवणारा, वैचारिक दृष्टा परिपक्व करणारा मीच आहे. ते बघू नंतर. आज आपल्याला काम करायचं आहे, असं वाघमारे म्हणाले.
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात वैजनाथ वाघमारे यांचा प्रवेश होणार आहे. याच कार्यक्रमात अभिनेत्री दिपाली सय्यद देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मात्र, वाघमारे यांना प्रवेश देऊन शिंदे गटाने सुषमा अंधारे यांची डोकेदुखी वाढवल्याचं सांगितलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- T20 World Cup | टी 20 विश्वचषक अंतिम फेरीमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय
- T20 World Cup | टी 20 विश्वचषक विजेत्यास मिळणार ‘एवढी’ रक्कम ; IPL बक्षीस रक्कमेसोबत बरोबरी सुद्धा होऊ शकणार नाही
- Eknath Khadse | एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना खुलं आव्हान; म्हणाले, “सगळे बोके एकत्र आले तरी…”
- Sushma Andhare | शिंदे गटाचा मोठा डाव! सुषमा अंधारे यांचे विभक्त पती करणार शिंदे गटात प्रवेश
- T20 World Cup | टी 20 विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी शोएब अख्तरने इंग्लंडला दिला स्पष्ट इशारा, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

