🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. प्रचारादरम्यान अनेक नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाशी-भूम -परांडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांनी वाशी येथे सभा घेतली. यावेळी बोलताना ‘एक धरण फुटलं होतं, तेव्हा महाराष्ट्रातील एका मंत्र्यानं उत्तर दिलं की ते खेकड्यानं फोडलं होतं. मला तेव्हा दिल्लीतून काहींचे फोन आले, तुमच्या महाराष्ट्रात खेकड्यानं धरण फोडलं असं मत्रीमहोदय सांगत असल्याची विचारणा झाली. तेव्हा ते हसायला लागले, मी दम देऊन माझ्या महाराष्ट्राला हसायचं नाही, असं बजावलं असं त्याम्हनाल्या आहेत.
मी खेकडा खाते, आपण खेकड्याला खातो, तो कशाला आपल्याला खाईल. खेकडा कशाला धरण फोडेल असं ते म्हणाले. तसेच, महाराष्ट्राला भिकेला लावेल, असं वक्तव्य सावंत यांनी केलं होतं. यवर बोलताना सुळे यांनी महाराष्ट्रात, देशात, जगात कुठेही… माझ्या महाराष्ट्राला भिकारी म्हणणारा माणूस मला चालणार नाही. माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्राला वाकडं नजरेनं जरी पाहिलं तर गाठ सुप्रिया सुळेंशी आहे. महाराष्ट्राला भिकारी म्हणाऱ्याला तुम्ही मतदारसंघातून हद्दपार करा, मी महाराष्ट्रातून हद्दपार करते असं त्या म्हणाले आहेत.
दरम्यान, वाशी-भूम -परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंत यांच्याविरोधात राष्ट्रवादीने राहुल मोटे यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या त्यावेळी सावंत यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी निशाना साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183330207127629824?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183329975899836417?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183325843315032065?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

