Share

देशाच्या तिजोरीत खडखडाट करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही – सुप्रिया सुळे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नंतर आता वर्ल्ड बँकेच्या ताज्या अहवालाने केंद्र सरकारला मोठा धक्का दिला आहे. सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या विकासदरात आणखी घसरण होणार असल्याचा आंदाज वर्ल्ड बँकेने वर्तवला आहे. २०१९-२० मध्ये भारताचा विकासदर ६ टक्क्यांपर्यंत घसरेल, असं वर्ल्ड बँकेनं म्हटलं आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर हा ६.९ टक्के इतका होता. तर २०२२ पर्यंत भारताचा आर्थिक विकासदर हा ७.२ टक्क्यांपर्यंत जाईल, असा दावा सरकारकडून केला जात होता.

दरम्यान, आता देशाच्या या स्थितीवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. हे सरकार आर्थिक आघाडीवर सपशेल फेल झालंय.जागतिक बँकेने आपल्या अहवालात भारताचा वृद्धीदर घटून ६ टक्क्यांवर राहील असं नमूद केलं आहे.याशिवाय २०१८-१९ च्या तुलनेत वित्तीय तूट १.८ वरुन २.१ पर्यंत जाईल असं जागतिक बँकेच म्हणणं आहे. देशाच्या तिजोरीत खडखडाट करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. असा घणाघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केला आहे.

तर, IMF ने याच आठवड्यात भारताचा या वर्षाचा आर्थिक विकासदर घसरणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. IMF ने ०.३० टक्क्यांनी घटवून विकासदर आता ७ टक्के इतका वर्तवला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने भारताचा विकासदर ६.८ टक्क्यांवरून घसरून ६.१ टक्के इतका अंदाज वर्तवला आहे. देशांतर्गत मागणीत घट झाल्याने आर्थव्यवस्थेला मरगळ आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आयएमएफ आणि वर्ल्ड बँकेची वार्षिक बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी हा अंदाज आला आहे. २०१७-१८मध्ये विकासदर ७.२ टक्क्यांवर पोहोचला होता. हा विकासदर २०१८-१९मध्ये ६.८ टक्क्यांपर्यंत घसरला. आता त्यात आणखी घसरण होऊन विकासदर केवळ ६ टक्के होण्याचा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183338420430487552?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!