पुणे : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. तर पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांनी बाजी मारली आहे.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. या जागेवर गेली कित्येक टर्म भाजपचा गाजावाजा होता. खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोनदा या मतदारसंघातून निवडून आले होते.
मात्र, यंदा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं तगडं आव्हान भाजपसमोर होतं. भाजपला रोखण्याची शक्कल या तिन्ही पक्षांनी एकत्र येत योग्य पद्धतीने राबविल्याची या निकालातून दिसत आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकत्र ताकद लावल्यामुळे आमच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. लोकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. लोकांनी आम्हाला ज्या विश्वासाने मतदान केले, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही सुप्रिया यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपकडे झुकलेल्या मतदारांचा त्या पक्षाकडून भ्रमनिरास होत असल्याचे चित्र आहे : आप
- पेपरवर लिहून देतो, राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही – हसन मुश्रीफ
- ‘जुग जुग जियो’च्या शुटिंगदरम्यान अनिल कपूर, वरुण धवन, नीतू सिंह यांना कोरोनाची लागण
- ‘…पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्र पक्षांनीच रचला मृत्यूचा सापळा’
- ‘फडणवीस आणि चंद्रकांतदादा म्हणत असतील, काश ईव्हीएम होता तो अच्छा होता’


