महाराष्ट्र देशा टीम : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आणि आता लॉकडाउनच्या काळात विरंगुळ्यासाठी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण काही ना काही भन्नाट गोष्टी करत आहेत. चित्रकला, हस्तकला, पाककला हे तर केले जात आहेत.
अभिनयाचा किडा कलाकाराला स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच तर काय अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी पण त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ‘जा रे जा ओ हरजाई’ या गाण्यावर त्या थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव व डान्समधील सहजता पाहून नेटकरी त्यांच्या प्रेमात पडले आहेत. या व्हिडीओ शूट करण्यापूर्वी थोडंसं दडपण होतं, पण गाणं वाजू लागल्यावर ते दडपण गेलं आणि मी मुक्त नाचू लागले, असं त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. ‘कलाकाराने नेहमीच स्वत:च्या कलेची परीक्षा घ्यावी असं म्हटलं जातं. मीसुद्धा हा छोटासा प्रयत्न केला आहे’, असं त्यांनी म्हटलं.
यासोबतच त्यांनी ‘ससूराल गेंदा फूल’ या मालिकेच्या सेटवरील एक डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘आज फिर जिने की तमन्ना है’ या गाण्यावर त्यांनी ठेका धरला होता. त्यांना हा व्हिडीओ कोणीतरी सोशल मीडियावर फॉरवर्ड केला आणि त्यांनी तो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. हे दोन्ही व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

