Share

नवजोत सिंह सिद्धू यांना मोठा धक्का; ‘त्या’ प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. त्यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

नेमके प्रकरण काय?

27 डिसेंबर 1988 साली नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांचे मित्र रुपिंदर सिंग संधू यांचा पटियाला येथे कार पार्किंगवरून गुरनाम सिंग नावाच्या वृद्धाशी वाद झाला होता. यामध्ये गुरनामचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांच्याविरोधात निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंजाब सरकार आणि पीडितेच्या कुटुंबाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर 1999 मध्ये सत्र न्यायालयाकडून नवज्योत सिंग सिद्धू यांना दिलासा मिळाला आणि खटला फेटाळण्यात आला.  आरोपींविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत आणि अशा प्रकरणात केवळ संशयाच्या आधारे खटला सुरू करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. मात्र 2002 मध्ये राज्य सरकारने सिद्धू यांच्याविरुद्ध पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात अपील केले होते. या प्रकरणीच न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!