Share

‘नियमांचे पालन केल्यास मावळ तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळणार नाही’

Published On: 

मावळ : देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

याच पार्श्वभूमीवर नियमांचे पालन केल्यास मावळ तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळणार नाही,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी व्यक्त केला आहे.

याचप्रमाणे सध्या देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे मावळ तालुक्यात शेळके यांनी मतदारसंघातील सर्व गरजूंना रेशन किट वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला, ज्याद्वारे त्यांनी आजपर्यंत सुमारे २० हजार कुटुंबांना हक्काचे रेशन दिले आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव निम्म्या पुणे जिल्ह्यात झाल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 7 तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर सहा तालुक्यात ‘कोरोना’चा एकही रुग्ण सापडलेला नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!