🕒 1 min read
पुणे : यंदा सण-उत्सव साजरे करण्यावर कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्बंध आले आहेत. गणेशोत्सव, ईद, दसरा, यासोबतच सर्व धर्मिय सणांवर कोरोनाचे सावट असल्याने सर्व सण साधेपणाने व खबरदारीने साजरे करावेत असे आवाहन प्रशासनाने केले होते. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत नागरिकांनी देखील साधेपणाने हे सण साजरे केले.
नुकत्याच झालेल्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी देखील वारकरी मंडळींनी पंढरपूरला जाणे टाळले. आता आळंदीत येत्या 6 तारखेपासून साजऱ्या होणाऱ्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या संजीवन समाधी सोहोळ्यावेळी गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीनं खबरदारीचा उपाय म्हणून आळंदी आणि परिसरात उद्या म्हणजेच ६ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
उद्यापासून आळंदीत कलम 141 लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरील आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आळंदी शहरात प्रवेश करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर यंदाचा संजीवन समाधी सोहळा कसा पार पडणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरवर्षी लाखो वारकरी माउलींच्या या सोहळ्याचा भाग होत असतात. मात्र यंदा, आषाढी, कार्तिकी पाठोपाठ हा सोहळा देखील वारकऱ्यांच्या मेळ्याविनाच होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता डिसले गुरुजीं आमदार होणार? दरेकर करणार शिफारस
- मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी आता पाच वकिलांची समन्वय समिती
- संजय राऊत म्हणतात…’उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आमचे डॉक्टर’
- कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांचा खटला विनामूल्य लढणार – ज्येष्ठ विधिज्ञ दवे
- आता मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडीचं एकीचं बळ दिसणार? संजय राऊत म्हणतात…


