Share

राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई ; दिवसभरात 104 गुन्ह्यांची नोंद

Published On: 

मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद आहे. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्रीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई सुरू आहे. काल म्हणजेच 14 एप्रिल 2020 रोजी राज्यात 104 गुन्हे नोंदविण्यात आले असून 59 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 14 वाहने जप्त करण्याबरोबरच 50 लाख 86 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

14 तारखेच्या अवैध मद्याविरुद्ध कारवाईमध्ये सर्वात मोठी कारवाई अहमदनगर जिल्ह्याची असून तेथे निमगाव कोऱ्हाळे तालुका राहता येथे बिअरचे 844 बॉक्स व वाईनचे 120 बॉक्स असे एकूण 24.39 लाख किमतीचे 964 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.

24 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत राज्यात 2 हजार 697 गुन्हे नोंदविण्यात आले असून 1 हजार 103 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 157 वाहने जप्त करण्यात आली असून 6 कोटी 894 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४×७ सुरू आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००८३३३३३३, व्हाट्सअप क्रमांक ८४२२००११३३ आहे. या क्रंमाकावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!