मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरी लाट ही अत्यंत भयंकर असल्याचे कोरोना रुग्णांच्या आकड्यांवरून दिसून येत आहे. या लाटेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण देखील वाढत असून अनेकांना आपले प्रियजन गमवावे लागत आहेत.
अशा परिस्थितीत सोनू सूद पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे. कोरोनाच्या सध्याच्या महाभयंकर लाटेत सोनू लोकांचे जीव वाचवताना दिसतोय. देशात ऑक्सिजन आणि बेड्सचा प्रचंड तुटवडा आहे. अशास्थितीत सोनू व त्याची टीम गरजू रूगणांना आॅक्सिजन पुरवण्याचे, बेड्स उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे.
त्यामुळे आता ऑक्सिजन व बेड्ससाठी भटकत असलेल्या कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांची सोनू सूदच्या इमारतीखालीही खळबळ पाहायला मिळाली आहे. आजही लोक संकटात सोनूच्या घराखाली पोचले. सोनू सूद यांच्या इमारतीखाली जनता दरबार झाला आहे. येथे सोनू सगळ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांना मदत करताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- खिलाडी कुमारचा ‘रामसेतु’चे चित्रीकरण पुन्हा होणार सुरु; गुफांचा मोठा सेट बनवण्यात आल्याची चर्चा
- ‘मोदीजी…इंधनदरवाढीच्या माध्यमातून सुरु असलेली जनतेची लूट आता तरी थांबवा’
- गंभीर! दावा ३० कोटी लसीकरणाचा, प्रत्यक्षात मात्र ४ कोटी नागरिकांना मिळाली लस
- तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका; मुख्यमंत्र्यांनी दिला डॉक्टरांना ‘हा’ खास सल्ला
- मलायका सोबतच्या अफेयरवर अर्जून कपुरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

