🕒 1 min read
मुंबई : आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’च्या शुटिंग दरम्यान स्टार कास्टला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेता अनिल कपूर, वरुण धवन, अभिनेत्री नीतू सिंह आणि दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली.
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरत होत्या. त्यानंतर अनिल कपूर ने स्वत: ट्विट करत सत्याचा उलघडा केला आहे. कोरोना रिपोर्ट निगेव्हीट आला असून सोशल मीडियावर पसरणाऱ्या बातम्या फेक असल्याचे अनिल कपूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, यावर अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर चांगलीच भडकली आहे. तिने ट्विटच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या देणे भयानक असल्याचे म्हटले आहे. तसंच जबाबदारीने पत्रकारिता करण्याचा सल्लाही तिने दिला आहे. सोनम कपूर हिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, चुकीच्या बातम्या देणे भयानक आहे. मी लंडनमध्ये आहे आणि मी माझ्या वडीलांशी बोलण्यापूर्वीच काही मीडियातून चुकीची माहिती पसरवली जात आहे. कृपया पत्रकारीता जबाबदारीने करा.
False reporting is dangerous. I’m sitting in london and I see incorrect information peddled by some parts of the media before I can even speak to my father. Please be responsible in your reportage. https://t.co/wJOdbeXxKu
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) December 4, 2020
अनिल कपूर चंदीगढ मध्ये वरुण धवन, कियारा अडवाणी आणि नीतू सिंह सोबत ‘जुग जुग जियो’ चे शूटिंग करत होते. या चित्रीकरणादरम्यान, नीतू सिंह आणि निर्देशक राज मेहता यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आणि शूटिंग थांबवण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल; शिवसेनेची भाजपवर टीका
- टीम इंडियाच्या गब्बरचा आज जन्मदिवस
- मोठी बातमी : शेतकऱ्यांची ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक!
- मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
- ‘आम्ही सर्वशक्तिमान एकटेच लढणार व जिंकणार हि खुमखुमी त्यांचीच होती, ती चांगलीच जिरली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

