Share

महाराष्ट्रात ‘करोना’ च्या सर्वांधिक चाचण्या झाल्यामुळे रुग्णांची संख्या जास्त; पण राज्य लवकरच करोना मुक्त : अमित विलासराव देशमुख

Published On: 

🕒 1 min read

लातूर : कोविड १९ च्या संदर्भाने महाराष्ट्रात सर्वाधिक तपासण्या आणि जास्तीचे स्कॅनिग होत आहेत, त्यामुळे या राज्यात सर्वाधिक रुग्ण असल्याचे दिसून येत आहे. परंतु जास्तीच्या खबरदारीमुळे हे राज्य लवकर कोरोना मुक्त होईल असे सांगून लातूर जिल्हा आजवर या साथीपासून सुखरूप राहिला आहे, यापुढेही तो सुखरूपचं राहील या दृष्टीने नियोजन आखून त्याची अंमलबजावणी सुरु असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.

पालकमंत्री देशमुख यांनी गुरुवारी टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे येथील पत्रकारांशी पहिल्या टप्प्यात संवाद साधला. महाराष्ट्र आणि लातूर जिल्ह्यात कोविड- १९ रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनच्या संदर्भाने शासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाय योजनेची माहिती दिली त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सामाजिक अंतर राखायचे असल्यामुळे ठराविक लोकांशी बोलता येत आहे. तंत्रज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेता आज काही पत्रकारांशी बोललो आहे, उदया, परवा काही पत्रकारांना बोलून त्यांचे शंकासमाधान केले जाईल त्यांच्या सुचना घेतल्या जातील असेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रसंगी पुढे बोलतांना पालकमंत्री देशमुख यांनी लातूर जिल्हा कोवीड १९ मुक्त ठेवण्यासाठी प्रशासन, पोलीस, आरोग्य कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. पत्रकारानीही वेळोवेळी आपल्या लिखानातुन केलेल्या सुचनांचा उपयोग झाल्याचे त्यांनी सांगितले. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थेत ८ कोवीड – १९ चे रूग्ण असले तरी ते इतर राज्यातील प्रवासी मंडळी आहेत. त्यांचा लातूरशी काही संबंध नाही. त्यापैकी तीन जणाचे अहवाल निगेटीव्ह आले असुन बाकीचे पाच जण लवकरच बरे होतील त्यानंतर त्यांना त्या राज्यात पाठविले जाईल.

लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्या संबंधी लातूर जिल्हयात काटेकोर अमंलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. जिल्हयात आणि लातूर शहरात बाहेरून कोणी येणार नाही याची दक्षता घ्यायला सांगीतले आहे. बॅक, रेशनदुकान, फळभाज्याचे स्टॉल याठिकाणी गर्दी होत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर यासर्व ठिकाणी सामाजिक अंतर पाळावेत अशा सुचना दिल्या आहेत. त्यामुळे या पध्दतीच्या जीवनशैलीची सवय आपणाला लावून घेणे गरजेचे आहे. घराबाहेर पडणाऱ्यांनी मास्क किंवा रूमालाचा वापर करणे अनिवार्य केले आहे. येणाऱ्या ३ मे पर्यत ही परिस्थिती जैसे थे ठेवण्यात येणार आहे.

२० एप्रिल नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्याची चर्चा मंत्रीमंडळात सुरू आहे. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे त्या संदर्भात अधिकृत घोषणा करतील त्यानंतर त्यावर अमंलबजावणी होईल. केंद्राकडून शेतीच्या कामांना या लॉकडाऊनमध्ये सुट दिली आहे. त्यामुळे गाळ काढणे, रोजगार हमी योजनेतून शेततळी, पाणंद रस्ते खुले करणे यासारखी कामे लगेच सुरू होतील असे ही पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

लातूरात करोना तपासणी प्रयोगशाळा होणार

लातूरात करोना तपासणीची प्रयोगशाळा होणार असे आपण जाहीर केले होते मात्र काल परवा जाहीर झालेल्या यादीत लातूरचे नाव नाही असे पुण्यनगरीचे पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी निर्दशनास आणून दिले असता प्रत्येक जिल्हयात अशी प्रयोगशाळा उभाण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासकीय तसेच खाजगी वैदयकीय महाविदयालयातही या प्रयोगशाळा उभारण्यास सांगीतल्या आहेत. त्यामूळे येत्या काही दिवसात लातूरातील प्रयोगशाळेत तपासणीचे काम सुरू होईल असेही त्यांनी सांगीतले. प्रयोगशाळेच्या मंजूरीसाठी प्रशासकीय बाबीची आवश्यकता असते त्यामुळे थोडा विलंब होत असावा दिल्ली येथून आसीएमआर कडून यासाठीची अंतिम मंजूरी लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे. पूणे पेक्षा सोलापूर येथून तपासणीचे रिपोर्ट येण्यास वेळ लागत आहे का या उपप्रश्नावर बोलतांना अशी वस्तुस्थिती नाही असे सांगून पालकमंत्री देशमुख म्हणाले की, सांगली, पुणे येथे नजीकच्या प्रयोगशाळा असल्यामुळे सोलापूरवर तेवढा लोढ नाही त्यामूळे तेथे उशीर होण्याचे कारण नाही.

सामाजिक अंतर पाळण्याची पुर्व तयारी केल्या नंतरच बाजार समितींना परवानगी

उदगीर येथे परवा बाजार समितीचे कामकाज सुरू झाले परंतु तेथे सामाजिक अंतराचा कोणताही नियम पाळला जात नाही तेथे लॉकडाऊनचा फज्जा उडाला आहे त्यावर काय कार्यवाही करणार असे झी २४ तासचे पत्रकार शशिकांत पाटील यांनी विचारले असता आपली माहिती तपासुन घेऊ, खरोख्रच तशी परिस्थिती असेल तर तेथील व्यवहार थांबवून पूर्व तयारी केल्यानंतरच बाजार समितीचे कामकाज सुरू करण्यास सांगितले जाईल असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगीतले. द्राक्षे वाहतुकीला परवानगी नसल्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल किंमतीला विक्री करावी लागत आहे. यावर काय उपाययोजना करणार का असे विचारले असता, याबाबत बाजार समिती कडून माहिती मागवली जाईल २० एप्रिल नंतर शेती व शेतीआधारीत उदयोगांना लॉकडाऊन मधून सुट दिली जाणार आहे. त्या संदर्भातील स्पष्टता आल्यानंतर द्राक्षासह शेतीमालाच्या वाहतुकीवरील निर्बध हटवले जातील असे त्यांनी सांगितले. लातूर जिल्हयातील बालाजी दापके या रूग्णावर हैद्राबाद येथील रूग्णालयात उपचार करणे गरजेचे आहे त्यासाठी प्रवास करणे शक्य होइल का असे विचारले असता आपण यात व्यक्तीशा लक्ष घालून गरज पडल्यास संबंधित रूग्णालयाशी बोलून त्यानंतर त्यांच्या प्रवासासाठी विशेष परवानगी मिळवून दिली जाईल असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख सांगितले.

उपचारा नंतर परराज्यतील रुग्णांना त्यांच्या मुळगावी पाठविले जाईल

लातूर येथे उपचार घेत असलेले परराज्यातील कोवीड १९ रूग्णांना ते दुरूस्त झाल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात त्यांना त्यांच्या मुळ गावी पाठविणे शक्य आहे का असे लोकमतचे पत्रकार धर्मराज हल्लाळे यांनी विचारले असता, अश्या रूग्णावर उपचार पूर्ण होऊन ते बरे झाल्या नंतर त्यांच्या दोन चाचण्या घेऊन आरोग्य विभागाच्या प्रोटोकॉलनुसार त्यांना त्यांच्या घरी पाठवावे असा नियम आहे. या सर्व रूग्णाचे रिपोट निगेटिवह आल्यानंतर विशेष परवानगी घेऊन्‍ आध्रप्रदेशातील त्यांच्या गावी त्यांना पाठविण्यात येईल. केंद्रसरकार आणि राज्यसरकार यांच्याकडून परवानगी मिळविण्यात काही अडचणी आल्यास या रूग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल व ४ मे नंतर त्यांना त्यांच्या गावी पाठविले जाईल. करोना तपासणी प्रयोगशाळेच्या प्रश्नाच्या संदर्भाने बोलतांना आता पर्यंत राज्यात शासकीय आणि खासगी मिळून तीस ते बत्तीस प्रयोगशाळा सुरू झाल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!