औरंगाबाद : बीडच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांचा १७ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रम घेतले जातात. तसेच मोठ्या उत्साहात खा.मुंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करू नका असे आवाहन मुंडे यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे. याबाबत त्यांनी एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे.
https://www.facebook.com/DrPritamMunde/posts/1645814892275714
कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन परिस्थिती गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करू नका. शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मी मुंबई किंवा बीड कार्यालयात उपलब्ध नसेल. शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मी फोन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध आहे अशी माहितीही खा.मुंडे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचं ‘शिवसंपर्क अभियान’ चालू शकतं तर मग शिवभक्तांच्या शिवजयंतीवरच निर्बंध का ?
- ‘काँग्रेसचा खोटारडेपणा असाच सुरु राहिला तर काँग्रेस इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही’
- संजय राठोडांनी राजीनामा दिला ही माहिती चुकीची; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
- भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
- आगामी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचं ठरण्याआधीच भाजप-रिपाइंचं ठरलं ?


