Share

अबब! साप- मुंगुसाच्या भांडणात ५ दुकाने भस्मसात

Published On: 

नांदेड : साप आणि मुंगूसच्या भांडणाबद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलोय. काहींनी हे भांडण प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवले ही असतील पण या भांडणामुळे कोणाची दुकान जळाली असे ऐकले आहे का? हो अशीच एक घटना नांदेड येथील लोह तालुक्यात घडली आहे. साप – मुंगूस यांच्या झुंजीमुळे पाच दुकानांना आग लागली आहे. त्यामुळे जवळपास १० लाखांचे नुकसान झाले आहे.

गंगाखेड मार्गावरील श्री बालाजी मंदिरासमोर राजू बोडके यांचे दुकान आहे. तेथे व्यापारी किरकोळ कापूस खरेदी करून जमा करतात. या एका शटरमध्ये नाग आणि मुंगुस यांची झुंज सुरु झाली. नाग तसा विषारी, पण मुंगुसही काही कमी नसतो. त्यानेही तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. या संघर्षात विद्युत तारेचे घर्षण झाले आणि ती तार तुटून कापसावर पडली. मुंगुस पळून गेले, कापसाने पेट घेतला आणि नाग काही प्रमाणात आगीत होरपळला.जखमी स्थितीत नागही कसा बसा बाहेर आला आणि लपला.

मात्र सर्पमित्र वेदपाठक यांना घटनेची माहिती दिल्यावर ते आले आणि त्यांनी या नागास पकडून त्याच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार केले. नंतर त्याला मुक्त करण्यात आले. ही झुंज इतकी घातक होती की, विद्युत तार तुटून पडली स्पार्किंगमुळे कापसाने पेट घेतला, चपळ मुंगुस तर पळून गेले पण साप मात्र कापसाच्या आगीत सापडला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!