🕒 1 min read
लातूर : कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केलेली आहे. समाज कल्याण विभाग जि.प. लातूर यांच्या मार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.
या कालावधीत जिल्हा दिव्यांग कल्याण निधीतून 160 अतितीव्र दिव्यांग मुलांच्या पालकांना प्रत्येकी 6 हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात आलेले असून रुपये 9 लाख 60 हजार निधीचे वितरण करण्यात आलेले आहे. या कालावधीत कोणत्याही दिव्यांग मुलांची उपासमार होणार नाही याची खात्री अतितिव्र दिव्यांग व्यक्तींच्या पालकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण आधिकारी सुनिल खमितकर यांनी केले आहे.
दरम्यान, आज विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 15.04.2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 1.30 पर्यंत एकुण 40 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत एकुण 5838 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन त्यापैकी एकुण 176 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 162 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन यापूर्वीच दिनांक 04.04.2020 रोजी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत व सहा व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहे. आजपर्यंत 64 व्यक्तींचा Home Quarantine कालावधी समाप्त झाला असुन एकुण 83 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantine मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच 16 व्यक्तींना Institutional Quarantine मध्ये ठेवण्यात आले आहे व 13 व्यक्तींना या संस्थेच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे अशी माहिती डॉ. मारुती कराळे कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग व यांनी दिली.
प्राथमिक तपासणी नंतर COVID-19 आजारा सारखी लक्षणे आढळल्यास किंवा कोरोना बाधित / संशयित व्यक्तींचा संपर्क झाला असेल तर अशा व्यक्तींना व प्रवाशांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर येथील कोरोना विलगीकरण कक्षात तपासणीसाठी पाठविण्यात यावे असे आवाहन डॉ. गिरीष ठाकुर अधिष्ठाता, व डॉ. संतोषकुमार डोपे वैद्यकीय अधिक्षक विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर यांनी केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

