Share

‘तीन पक्ष एकत्र आल्यानंतर बहुजन समाजाची ताकद किती प्रमाणात वाढू शकते याच हे उदाहरण’

Published On: 

🕒 1 min read

सातारा : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.पुणे शिक्षक आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे धोरण आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे तोरण, यामुळेच पदवीधर शिक्षक निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे. महाविकास आघाडी स्थापन होऊन एक वर्ष झालं आणि हे दणदणीत यश आलं. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर बहुजन समाजाची ताकद किती प्रमाणात वाढू शकते याच हे उदाहरण आहे, असंही राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या निकालाचे आश्चर्य वाटले नाही. मात्र, भाजपाचे बालेकिल्ले असलेल्या पुणे आणि नागपुरात महाविकास आघाडीला मिळालेले यश खूप महत्वाचे आहे. महाविकास आघाडीने गेले वर्षभर एकत्र येऊन काम केले, ते लोकांनी स्वीकारले आहे. महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळत आहे, असे पवार म्हणाले.

दरम्यान, कॉंग्रेसच नेते आणि मंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. ‘नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार, काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांचा विजय म्हणजे दीक्षाभूमीचा ‘संघ’भूमीवर विजय आहे.नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या विजयाचा विशेष आनंद होत असून यासाठी हातभार लावणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार’! अस नितीन राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!