Share

मुख्यमंत्री म्हणतात नाणार होणार, तर देसाई म्हणतात माय व्याली तरी शिवसेना नाणार होऊ देणार नाही

Published On: 

🕒 1 min read

टीम महारष्ट्र देशा : नाणार प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा दुमत असल्याचं समोर आलं आहे. तेल रिफायनरी प्रकल्प नाणारमध्येचं उभारण्यास भाजप आग्रही आहे. तर शिवसेनाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा नाणार आणू अशी घोषणा केली होती. यावर सुभाष देसाई उत्तरले आहे. कुणाची माय व्याली तरी शिवसेना नाणार पुन्हा होऊ देणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी दिली आहे.

कणकवलीतील शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचार सभेत बोलताना देसाई यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.सरकारमध्ये शिवसेना भागीदार आहे. भाजपवाले नाणार पुन्हा आणू, असं म्हणत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नितेश राणेंनी आता नाणारबाबत भूमिका स्पष्ट करावी. पण कुणाची माय व्याली तरी शिवसेना नाणार पुन्हा होऊ देणार नाही, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.

दरम्यान महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकणात गेले होते. त्यावेळी त्यांनी नाणार बाबत भाष्य केले. नाणार प्रकल्पामुळे कोकणातील एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार असेल तर या रिफायनरी प्रकल्पाचा फेरविचार करायला काहीच हरकत नाही. मी अगोदरपासूनच हा प्रकल्प व्हावा असे म्हणत होतो , असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पुन्हा नाणारवरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये दुमत असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1182623401703178240?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182620799988928512?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182618813210083328?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!