Share

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास सेनेला दु:ख होणार नाही, शिवसेनेच्या माजी खासदाराचे विधान

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुका अजून पार पडायच्या आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी मोठे विधान केले आहे.

अनंत गीते यांनी शिवसेना आणि भाजप हे पक्ष एकमेकांचे शत्रू होऊ शकत नाहीत. दोन्ही पक्ष समान विचारांवर एकत्र आले आहेत. त्यामुळे युतीमध्ये कोण मोठा आणि कोण लहान हा मुद्दाच असू शकत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर शिवसेनेला दु:ख होणार नाही असं विधान केले आहे.

काही लोकांनी युती होऊ नये म्हणून प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश आलेल नाही. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे. तसेच सेना-भाजपमध्ये काही मुद्दय़ांवरून मतभेद असू शकतात. निकोप स्पर्धाही असू शकते. दोन्ही पक्ष आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करू शकतात असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आम्हीच सत्ता स्थापन करणार असा दावा भाजप सेनेचे नेते करत आहेत. तसेच मुख्यमंत्रीपदावरही दावा करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183249379769012224?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183248942105890816?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183243187495694337?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!