🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनामुळे लॉक डाऊन असूनही दोन दिवसापूर्वी वांद्रे येथे स्थलांतरित कामगार यांचा मोठा समुदाय जमा झाला होता. यावरून विरोधी पक्ष भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर टीका केली होती तसेच सोशल मिडियावर #UddhavResign हेही ट्रेंड करण्यात आलं होत. आत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर उत्तर दिलं आहे. त्यांनी झी २४ तास या वाहिनीला दिलेल्या बाईटमध्ये आपलं म्हणण मांडल आहे.
विरोधकांचे बाप, आजी आजोबा आणि अश्या १०० पिढ्या जरी मैदानात उतरल्या तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची संकल्पना वास्तवात येणार नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे सरकार मजबूत आहे. नेतृत्व खंबीर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संकटात चांगले काम करतायत याचे अनेकांना दु:ख होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा फायदा घेऊन राज्यात संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांमध्ये उद्रेक घडवून हे राज्य अस्थिर व खिळखिळे करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप राऊत यांनी विरोधकांवर केला.
विरोधी पक्ष जे राजकारण करतोय त्यांना कायमचं घरी बसावं लागेल. कुणी कितीही आपटू द्या काही फरक पडणार नाही, असंही खोचक टिप्पणी करत त्यांनी विरोधी पक्षाला टोला लगावला आहे. तसंच वांद्र्याचं प्रकरणं हे मुख्यमंत्र्यांमा बदनाम करण्यासाठी रचलं गेलं, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दुसरीकडे लॉकडाऊनच्या काळात सुरतमध्ये भयंकर प्रकार घडला. मात्र त्यावर विरोधकांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही. तेव्हा कोणीही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही, असा सवाल राऊत यांनी केला.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

