🕒 1 min read
लातूर : काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजप होणारे प्रवेश थांबता थांबेना. लातुरात उमेदवारी नाकारल्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. गुरुवारी रात्री उशिरा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
कव्हेकर यांनी 1995 मध्ये विलासराव देशमुख यांचा पराभव केला होता .त्यावेळेस पासून ते देशमुख यांचे कट्टर विरोधक मानले जात होते. त्यावेळेस पासून कव्हेकर देशमुख यांचे कधी जमले नाही . पण 2009 मध्ये लातूर मतदारसंघाची फेररचना झाली. त्यात लातूर शहर आणि ग्रामीण असे दोन मतदारसंघ झाले.
लातूर शहरातून अमित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी विलासराव देशमुख यांनी कव्हेकर यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर केली होती. त्यावेळेस कव्हेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गेली दहा वर्षे ते काँग्रेसमध्येच आहेत.

2014 च्या निवडणुकीमध्ये लातूर ग्रामीण मधून आपल्याला उमेदवारी मिळेल असे कव्हेकर यांना वाटत होते पण त्या वेळेसही त्यांना डावलण्यात आले . त्यावेळेस पासून कव्हेकर नाराज होते. 2017 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत कव्हेकर यांनी आपले पुत्र अजित पाटील कव्हेकर यांना भाजपमध्ये पाठवले . भाजपच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढविली . ते नगरसेवक झाले. त्यावेळेपासूनच कव्हेकर भाजपमध्ये जातील अशी चर्चा सुरू झाली होती. पण त्यांनी अधिकृत प्रवेश मात्र केला नव्हता.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182581064692162561?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182581038083538944?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

