🕒 1 min read
परतूर :- परतूर मतदार संघात कोणी सत्ताधाऱ्यांना विरोधक नाही .एक हानल्या वानी करतात एक रडल्यावानी करतात असे म्हणत वंचीत बहुजन चे अधीकृत उमेदवार शिवाजी सवने यांनी भाजप उमदेवार बबनराव लोणीकर आणि कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश जेथलीया यांच्यावर टीका केली. ते पत्रकार परिषदेत परतूर येथे बोलत होते.
ते म्हणाले, विद्यमान आमदार बबनराव लोणीकर दावा करतात कि मी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली मंग ती दिसत का नाहीत उलट त्यांनी जे दत्तक गावे घतले आहेत त्या गावाना पाणी नाही पिण्यासाठी आणि आपल्या मतदारसंघातील आमदार हे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रि आहेत.यांनी जर विकास केला असता तर यांना पंतप्रधान मोदीची सभा परतूरला आयोजन करण्याच काम पडलं नसतं. तसेच बबनराव लोणीकर हे दावा करतात कि पुर्ण जालना जिल्हा हगंदारी मुक्त झाला आहे तो फक्त कागदावर झाला आहे असे ते म्हणाले.
तसेच माजी आमदार सुरेश जेथलीया यांच्या वर ही सवने यांनी प्रतिक्रिया दीली ते म्हणाले जसा विरोध जेथलीया यांनी करायला पाहीजे होता तसा विरोधकाची भुमीका त्यांनी पार पाडली नाही. परतूर मंठा मतदारसंघात सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हे कळत नाही. शेतकर्यांना खरपीचा पिकवीमा मिळवण्यासाठी मी दहा दिवस आमरण उपोषण करूण जनतेला पिकविमा मिळुन दिला. या साठी नाही सत्ताधारी लोणीकराणी शेतकर्यांसाठी काही केले नाही विरोधी जेथलीया यांनी काही केले.
दरम्यान, शेतकर्यांना विहीरीचे अनुदान मिळवून देण्यासाठी मी रस्त्यावर उतरलो होतो. त्यावेळस विरोधी पक्षाने बघ्याची भुमिका घेतली आणि आज जनतेसमोर रडुन सहानभुती करत प्रचार करत आहेत.आज माझ्या विषय अप प्रचार करत आहे पण जनता जनाधन हुषार आहे मतदान करूण आपल्या कामाची पावती देतील.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183319319322562560?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183319066460573697?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

