🕒 1 min read
मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशात सामान्य माणसांपासून ते सेलीब्रिटीं पर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाली होती. त्यानंतर आता शिल्पाच्या कुटुंबीयांनी कोरोनावर मात केली आहे. काल शिल्पाने ‘ब्रदर्स डे’ निमित्त मुलगा विवान आणि मुलगी समीशाचा एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CPPniOJB1xx/?utm_medium=copy_link
शिल्पाने इनस्टाग्राम अकाऊंटवर समीशा आणि विवानचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पाने ‘माझ्या आयुष्यात माझे राखी भाऊ थोडे उशिरा आले. पण समीशा लकी आहे की तिच्याकडे तिचा भाऊ आहे. ‘ब्रदर्स डेच्या शुभेच्छा’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
तसेच या व्हिडीओमध्ये विवान नारळ पाणी पिताना दिसत आहे आणि समीशा ते घेण्यासाठी प्रयत्न करत असते. पण विवान अनोख्या पद्धतीने तिला नारळ पाणी देताना दिसतो. दरम्यान तो फ्रेंच स्टाइलमध्ये समीशाशी बोलताना दिसत आहे. शिल्पाच्या मुलांचा हा क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दोन वर्षाच्या मुलासाठी धावले विराट-अनुष्का ; १६ कोटींच्या औषधाची आहे गरज
- ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- ‘राहुल गांधी चांगले विरोधी पक्षनेते होऊ शकतात पंतप्रधान नाही’ : जावेद अख्तर
- ‘पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, त्यामुळेच ते संभाजीराजेंना भेटले नाहीत’
- अमृता सिंगसोबत साखरपुड्यानंतर मोडले होते रवी शास्त्री यांचे लग्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

