🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. यानिमित्त ते राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. बीड येथील सभेदरम्यान शरद पवारांनी अमित शहा यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला.
यावेळी ते म्हणाले, ‘आम्ही काय केलं हे विचारण्याचा अधिकार जनतेला आहे. अमित शाहांना नाही,’ असे म्हणत शरद पवारांनी अमित शहा यांचा चांगलाच समाचार घेतला. ते गेवराई येथे सभेदरम्यान बोलत होते.
पुढे बोलताना पवारांनी अमित शहा यांना लक्ष केले. म्हणाले, ‘अमित शाह महाराष्ट्रात येऊन आम्ही काय केलं विचारतात, पण त्यांना पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखत होतं का?’ असा सवाल यावेळी पवारांनी उपस्थित केला. बीडमध्ये विजयसिंह पंडित यांच्या सभेदरम्यान बोलत होते.
दरम्यान, लातूर येथे बोलताना पवार म्हणाले, ‘ईडी का फिडी मला कोणी काही करत नाही. मला सगळ्यांचे फोन आले, असं करु नका. तिकडे जाऊन नका असे अनेकजण सांगत होते. मी म्हणालो जाऊन येतो. पण त्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जाऊ नका. तसेच पोलिसांनी ही सांगितलं तुम्ही पण मुख्यमंत्री होता, तेव्हा असं करु नका असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183268018656178176?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183264716287700993?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

