Share

बार्शीतील सभेत शरद पवारांचे आक्षेपार्ह हातवारे, सोशल मिडीयावर झाले ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीच्या रणसंग्रामाला आता सुरवात झाली आहे. त्यामुळे जाहीरसभांमधून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवताना दिसत आहेत. या निवडणुकीत मजा येत नाही. कारण समोर कुस्ती लढायलाचं कोणी नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली होती. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बार्शी येथील सभेत पवारांनी चक्क हातवारे करून फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारासाठी आज बार्शी येथे आले होते. यावेळी शरद पवार यांनी भाजप – शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनतर पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचाही समाचार घेतला. विरोधक थकले आहेत. आमच्याशी कुस्ती लढायला समोर कुणीच नाही,’ असं वक्तव्य फडणवीस यांनी एका जाहीर सभेत केलं होतं.

यावर बोलताना ‘कुस्ती पैलवानांशी होते, या ‘अशांशी’ होत नाही, असे पवार म्हणाले. हे वाक्य बोलताना पवार यांनी काही आक्षेपार्ह हातवारे केले. हे हातवारे चित्रीकरणात दिसून आले. यानंतर पवारांचे हे हातवारे सोशल मिडीयावर चांगलेचं ट्रोल झाले.

https://twitter.com/Maha_Desha/status/1182930667455172608?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182930312373784582?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182928268355239937?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!