🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप – शिवसेनेत पक्षांतर केले. यावरून आज राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी गयारामांवर भाष्य केले आहे. अनेक जण आज पक्ष सोडून जात आहेत. पक्षात रहायचे की नाही हे ज्याचे त्याचे मत आहे. सोबत आले तर बरं.. नाही आले तर दुखवट्याचा ठराव मांडून पुढे जायचं, असे म्हणत शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर भाष्य केले. शिरूर मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारासाठी शरद पावर आज शिरूर येथे आले होते. यावेळी शरद पवारांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत जोरदार टोलेबाजी केली. तर पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवरही टीका केली.
अनेक जण आज पक्ष सोडून जात आहेत. पक्षात रहायचे की नाही हे ज्याचे त्याचे मत आहे. सोबत आले तर बरं.. नाही आले तर दुखवट्याचा ठराव मांडून पुढे जायचं…#शिरूर pic.twitter.com/vYQ1TnnItq
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 11, 2019
पवार म्हणाले की, आज अनेक जण पक्ष सोडून भाजप आणि शिवसेनेत जात आहेत. शेवटी पक्षात रहायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे सोबत आले तर बरं, नाही आले तर दुखवट्याचा ठराव मांडून पुढे जायचं. तसेच शरद पवारांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाही लक्ष्य केले. भाजपचा कुठलाही नेता इथं आला की माझं नाव घेतात. मला वाटतं की झोपेतही माझं नाव घेत असतील. लोकांच्या समोर शेतीचं नोकऱ्यांचा प्रश्न आहेत, शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या अनेक समस्या आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांच्या भाषणात 370 या मुद्द्यावरच जोर असतो. पुलवामाचा बदला हवाईदलाच्या सैनिकांनी घेतला मात्र क्रेडिट यांनी घेतले, अशी टीका पवार यांनी केली.
दरम्यान सत्ताधाऱ्यांना भानावर आणायचे आहे. आपल्याला परिवर्तन करायचे आहे,बदल घडवायचा आहे,म्हणून अशोक पवार यांना निवडून द्यायचे आहे. तुम्ही संधी दिली तेव्हा अशोक पवार यांनी चांगले काम केले. कारखाना योग्यप्रकारे चालवला, म्हणून मागील निवडणुकीत घेतला तसा निर्णय घेऊ नका आणि अशोक यांना निवडून आणा, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182612857701068803?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182612093834391552?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182611613406224384?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

