Share

साखर कारखाना बुडवून मतं मागताना लाज कशी वाटत नाही, पवारांचा कुल यांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : साखर कारखाना बुडीत निघाला. सभासद शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिले नाही आणि तरीही मतदारसंघात मतांचा जोगवा मागत आहात, असे करताना लाज कशी वाटत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दौंडचे भाजप उमेदवार राहुल कुल यांच्यावर नाव न घेता खरमरीत टीका केली आहे. आज वरवंड येथे राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे महाआघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते.

यावेळी शरद पवार यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या अवस्थेवर चिंता व्यक्त करत राहुल कुल यांचा चांगलाचं समाचार घेतला. पवार म्हणाले की, भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची सध्याची परीस्थीती पाहून मला झोप येत नाही. ज्यांच्या हातात कारखान्याचा कारभार आहे. त्यांनी सभासदांना उसाचा बाजारभाव दिला नाही. कामगारांचे पगार थकविले. सरकारकडुन घेतलेले पैसे काय केले याचा पत्ता नाही. मग ज्या व्यक्तीने तालुक्याची व्यवस्था बिघडवली अशा व्यक्तीला लोकांमध्ये जावून मत मागायला लाज कशी वाटत नाही ? असे पवार म्हणाले.

तसेच आज राज्यात भाजपची सत्ता आहे. याचे हे परिणाम आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ज्यांच्या हातात आहे. त्यांच्या हातातून आता कारभार काढून घेयचा आहे. त्यासाठी आता कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1182675440185401344?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182667254569275392?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182658951244058624?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!