🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : एकही वचन खोटं ठरणारं नाही, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचा वचननामा जाहीर केला. राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच वचननामा बनवला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. १० रुपयांत चांगलं सकस जेवण. तेही स्वच्छ आणि व्यवस्थित असेल. विशेषत: एका किचनमधून त्याचं वितरण केलं जाईल. महिला बचत गटांतील महिलांना यामध्ये सामावून घेतलं जाईल, असं शिवसेने वचननाम्यात म्हटलंय.
दरम्यान, शिवसेनेच्या या वचननाम्यावर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेने आपल्या वचननाम्यामध्ये १० रुपयात जेवणाची थाळी मिळेल, अशी घोषणा केलेली आहे. या घोषणेचा समाचार देखील पवार यांनी घेतला. “दहा रुपयांत जेवण राज्यात कुठे आणि किती ठिकाणी देणार? तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय? अन्नधान्याचा प्रश्न आहे पण त्यासोबतच इतर प्रश्न देखील राज्यात आहेत.” अशी टीका पवारांनी केली.
तर हा वचननामा नसून हा बनावटनामा असल्याची टीका काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टिवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा करणार, तर मग पाच वर्षे झोपा काढल्या का? असा सवाल ही त्यांनी शिवसेनेला केला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182930312373784582?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182928268355239937?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

