Share

शरद पवार यांना पाटील कळालेच नाहीत. – चंद्रकांत पाटलांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ” शरद पवारांना पाटील कळलेच नाहीत. हा पाटील चेहऱ्यावर कोणतेही भाव न आणता असा फटका लगावतो की समजत नाही, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचार सभेत बोलत होते. शिवाजी पेठेतील गडकरी हॉल येथे हा मेळावा पार पडला.

यावेळी ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मध्येच अडकवून ठेवलं असं शरद पवार म्हणत आहेत. मात्र मला अडकवून ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या राष्ट्रवादीला एकही उमेदवार देता ला नाही. ज्या मनसेला आघाडीत घेतलं नाही, त्या मनसेच्या उमेदवाराला आता ते कोथरुडमध्ये माझ्याविरोधात पाठिंबा देत आहेत. असंही पाटील म्हणाले. कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मनसेचे किशोर शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवार एकही उमेदवार दिला नाही. राष्टवादी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील विरुद्ध सर्वपक्षीय अशी लढत कोठ्रून मतदार संघातून पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, पवार यांनी ईडीच्या प्रकरणावरून पाटील यांनी पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर शरद पवार यांनी ”ज्या माणसाने निवडणूकही लढवली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार” असा पलटवार केला होता. त्यावर पाटील यांनी कोल्हापुरात बोलताना पवार यांच्यावर निशाणा साधत ” शरद पवार यांना राजकारणातून आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार. ” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1182538363959537664?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182538605413072898?s=20

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!