🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज शिवसेना – भाजपचा चांगलाचं समाचार घेतला आहे. छत्रपती शिवजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाची एक वीट उभी केली नाही, मात्र या सरकारच्या काळात गड किल्ल्यांवर छमछम बघायला मिळणार होते, असे म्हणत शरद पवारांनी भाजप – सेनेला लक्ष्य केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारासाठी आज बार्शी येथे आले होते. यावेळी शरद पवारांनी भाजपवर चांगलाचं हल्लाबोल केला. शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन राज्य चालवू म्हणणाऱ्यांनी अरबी समुद्रात एक वीटही उभी केली नाही असं म्हणत पवारांनी भाजपवर निशाणा साधला. तर भवानी तलवार चमकली तिथे भाजप सेनेच्या कारकिर्दीत छमछम बघायला मिळणार, असं वक्तव्य पवारांनी केलं.
या निवडणुकीत मजा येत नाही. कारण समोर कुस्ती लढायलाचं कोणी नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली होती. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ‘कुस्ती पैलवानांशी होते, या ‘अशांशी’ होत नाही, असे म्हणत शरद पवार यांनी फडणवीस यांना चांगलाचं टोला लगावला आहे.
दरम्यान राज्यातील गढ किल्यांवर खासगी विकसकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली होती. राज्य मंत्रीमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. यावर अनेक नेत्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली होती त्यानंतर हा सरकारचा निर्णय स्थगित करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182975233327656960?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182974537270349826?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182974315932733440?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

