🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूर येथील प्रचारसभेत बोलताना भाजपलाच चांगलेचं लक्ष्य केले. एअरस्ट्राईक सैन्याने केले मात्र त्याचे श्रेय भाजप घेत आहे, असे म्हणत ‘करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव अशी सध्याची भाजपाची परिस्थिती आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.
यावेळी शरद पवारांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाही लक्ष्य केले. भाजपचा कुठलाही नेता इथं आला की माझं नाव घेतात. मला वाटतं की झोपेतही माझं नाव घेत असतील. लोकांच्या समोर शेतीचं नोकऱ्यांचा प्रश्न आहेत, शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या अनेक समस्या आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांच्या भाषणात 370 या मुद्द्यावरच जोर असतो. पुलवामाचा बदला हवाईदलाच्या सैनिकांनी घेतला मात्र क्रेडिट यांनी घेतले, अशी टीका पवार यांनी केली. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. श्रेय मात्र नरेंद्र मोदी घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही पवार यांनी केला.
दरम्यान अमित शाह यांच्यावत टीका करताना शरद पवार यांनी गुजरातचे एक भलेमोठे गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नाही तरी यांच्या तोंडात माझेच नाव आहे. हे लोक निवडणूक शरद पवार या एका नावावरच लढवत आहेत अशी टीका भाजपवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182601560250966017?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182601318369656838?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182598829171859457?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

