🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा;- राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराने आता जोर धरला आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी प्रचारसभांचं आयोजन केलं जात आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची शुक्रवारी चाकण येथे प्रचार सभा पार पडली.यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले ज्यांच्या हातात तुम्ही मागच्या वेळी सत्ता दिली, त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. राज्याच्या भरीव विकासासाठी परिवर्तनाची गरज आहे, असे व्यक्त करत त्यांनी सरकारवर टीका केली.
तसेच खेड तालुक्यात धरणे झाली, शेती बागायती झाली; पण शेती दिवसेंदिवस कमी झाली. त्यामुळे उद्योगधंद्यांकडे लक्ष दिले पाहिजे.जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा आराखडा मी केला. त्यामुळे चाकण, रांजणगाव, तळेगाव व इतर भागांत औद्योगिक वसाहती झाल्या. त्यात लोकांना रोजगार मिळाला. परराज्यातील कामगारही येथे आला. येथे गुन्हेगारी वाढली. ती मोडीत काढण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या नाहीत, असे ही पवार म्हणाले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांकडून सभांचे आयोजन केले जात आहे. तसेच आपण केलेल्या कामाची पोचपावती पोहचविण्यासाठी नेते मंडली चांगलेच सक्रीय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182903938229526528?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182908437279072257?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

