🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढताना दिसतो आहे. काल राज्यात अनेक दिग्गज नेत्यांच्या झंजावती जाहीर सभा झाल्या.
तपास यंत्रणांचा वापर करून सरकार विरोधकांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. कारखानदारी बंद पडत आहे, बेरोजगारी वाढत असून विकास दर खालावत चालला आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्याची कुवत सत्ताधार्यांमध्ये नाही, अशी टीकाही पवार यांनी यवतमाळ इथं केली. वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथंही काल शरद पवारांची सभा झाली. नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे अशी टीका यावेळी त्यांनी केली.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1182244777237991424
तर राज्यात युतीच्या सरकारनं पाच वर्षात जी कामं केली आहेत त्या बळावर राज्यातील जनता युतीच्या उमेदवारांना विजयी करेल, असा विश्वास राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी वाशिम इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ मंत्री पंकजा मुंडे यांनी तीन जाहीर सभा घेतल्या असून महायुतीलाच मतदान करा, अस आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे क्षीरसागर यांचे पुतणे संदिप क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेच आयोजन करण्यात आलं आहे.
राज्यात पुन्हा युतीची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती देऊन सातबारा कोरा केला जाईल, तसंच घरगुती वापराच्या विजेच्या बिलात तिनशे युनीटपर्यंतचा वीजदर 30 टक्के कमी केला जाईल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल जालन्यात आयोजित जाहीर सभेत केली.
भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे प्रवक्ते भालचंद्र कांगो यांनी काल अहमदनगर मध्ये पत्रकार परिषद घेतली. उमेदवार बहिरनाथ वाकळे, यांच्यासह कार्यकर्त्यांची याला उपस्थिती होती. राज्यातील 16 विधानसभेच्या जागा भारतीय कम्युनिष्ट पक्ष लढवत असून माकप ने आम्हाला पाठिंबा दिला आहे असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182615053154959361?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182612857701068803?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

