🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. शरद पवार यांनी आज उरुळी कांचन येथे प्रचारसभा घेतली यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली.
अमित शाह यांच्यावत टीका करताना शरद पवार यांनी ‘गुजरातचे एक भलेमोठे गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नाही तरी यांच्या तोंडात माझेच नाव आहे. हे लोक निवडणूक शरद पवार या एका नावावरच लढवत आहेत’ अशी टीका भाजपवर केली आहे.
पुढे बोलताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात अनेक कारखाने आले, एमआयडीसी आल्या. अनेक युवकांना नोकऱ्या मिळाल्या परंतु आता काय?, शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाने काहीतरी दुसरा व्यवसाय केला पाहिजे जेणेकरून कुटुंब नीट चालेल असंही पवार केले आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी पुलवामाचा बदला हवाईदलाच्या सैनिकांनी घेतला मात्र क्रेडिट कुणी यांनी घेतले. ‘करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव अशी सध्याची भाजपाची परिस्थिती आहे असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182601560250966017?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182601318369656838?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182598829171859457?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

