Share

शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा पुन्हा एकत्र, का ते पहा?

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा टीम : कोरोनाशी लढणाऱ्यांसाठी निधी जमा करण्यासाठी अमेरिकन पॉप सिंगर लेडी गागानं ‘वन वर्ल्डः टुगेदर ऍट होम’ या लाइव्ह कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. लेडी गागासोबत हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज या कार्यक्रमासाठी पुढे आले आहेत आणि आता बॉलिवूडमधील शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रादेखील या ऑनलाइन कॉन्सर्टचा भाग होणार आहेत. शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा यांनी याआधी पंतप्रधान सहाय्यता निधीला आपली देणगी दिली आहे.

एका वृत्तानुसार, येत्या शनिवारी १८ एप्रिल रोजी अमेरिकन टीव्ही नेटवर्क एबीसी, सीबीएस आणि एबीसी ऑनलाइनवर या कॉन्सर्टचं प्रक्षेपण होणार आहे. घरी बसल्या सगळे सेलिब्रिटी या ऑनलाइन कॉन्सर्टमध्ये सहभागी होतील. लेडी गागासोबत बिली एलिश, कोल्डप्ले या रॉक बँडचा ख्रिस मार्टिन, एडी वेडर, एल्टन जॉन,कॅसी मस्ग्रॅव्ह, कीथ अर्बन हे आणि असे अनेक नामांकित सेलिब्रिटी यात सहभागी होतील. या कार्यक्रमाने जो निधी जमा होईल तो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला देण्यात येईल.

‘वन वर्ल्ड’ या संकल्पने अंतर्गत जगासाठी मदतीचा एक हात पुढे करण्यास ते सज्ज झालो आहे. शाहरुखने आपल्या ट्विटरवरुन तर प्रियंकानेही यासंदर्भातील तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक फोटो शेअर करून हे माहिती दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!