🕒 1 min read
मुंबई : ईडीने २५ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. यानंतर ईडीने विहंग सरनाईकची चौकशी करून त्यांना सोडले होते. यानंतर त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे अनेक समन्स बजावण्यात आले. मात्र, तरीही ते चौकशीला हजर राहिलेले नाहीत.
आमदार प्रताप सरनाईक यांचा देखील क्वारंटाईन कालावधी संपल्यामुळे त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. तसे समन्स प्रताप सरनाईकांना देखील ईडीने पाठवले होते. मात्र, प्रताप सरनाईक अद्यापही ईडी समोर हजर झाले नसून ते ईडीला चकवा देत आहेत, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी काल पुन्हा एकदा वाढीव मुदतीची मागणी केली आहे. या मागणीमध्ये त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी १४ दिवसांची वाढीव मुदत मागितली आहे. तसं पत्र देखील त्यांनी कालच ईडीला पाठवलं होतं.
ईडीने त्यांची ही मागणी धुडकावली असून आता त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडं लक्ष्य लागलं आहे. दरम्यान, आज शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांना यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर लीलावती रुग्णालयातून सोडण्यात आलं असून त्यांना सद्या अराम डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला त्यांनी सद्याच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली असून सरनाईकांच्या ईडी चौकशी प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे.
‘आम्ही कबड्डी-सूरपारंब्या खेळणारी माणसं, ईडी सोबत आम्ही नाही खेळत. मध्यमवर्गीय माणसं आहोत,’ अशा आपल्या चपखल उत्तर दिलं आहे. तर, डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य पाळणार का? असा सवाल केला असता, ‘आपण कधी पथ्य पाळतो का? थोडंफार राजकीय पथ्य पाळू ’ असं आपल्या शैलीत भाष्य देखील संजय राऊत यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात भाजपची घसरगुंडी पण हैद्राबादमध्ये मात्र जोरदार मुसंडी!
- टी-२० सामन्यात संकट मोचक ठरलेल्या जडेजाची एग्जिट
- आश्चर्य ! हरयाणाच्या आरोग्यमंत्र्यांना ‘कोवॅक्सिन’चा डोस घेऊन देखील झाला करोना…
- ‘हे हिंदू गद्दार आहेत’; युवराजच्या वडिलांची शेतकरी आंदोलनामध्ये वादग्रस्त वक्तव्ये
- येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास करणार; उद्धव ठाकरेंची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

