Share

Sanjay Raut | “राजकीय स्वार्थासाठी इतर नेत्यांना भारतरत्न दिला, मग…”, संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक सवाल

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर भाष्य केल्यानंतर भाजप पक्षाने शिवसेना पक्षाला तसेच राहुल गांधी यांना धारेवर धरलं. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना खोचक सवाल केला आहे.

यावेळी, वीर सावरकरांनंतर एकमेव हिंदुरुदयसम्राट ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे, हे आम्हाला रोज सांगण्याची गरज नाही, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची आम्ही गेल्या 15 वर्षांपासून मागणी करत आहोत, पण अजून दिला नाही, त्यांना भारतरत्न का दिला जात नाही? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तसेच, इतकंच कशाला तुम्हाला एवढंच प्रेम आहे तर सावरकरांच्या बरोबरीने बाळासाहेब ठाकरे यांनाही पुरस्कार द्या, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

राजकीय स्वार्थासाठी इतर नेत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे, असा आरोप देखील राऊतांनी केला आहे. पण बाळासाहेबांसारखा आणि वीर सावरकर सारख्या महान लोकांचा भारतरत्न किताबाने का सन्मान केला नाही? असा सवाल त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!